श्रीनगर – काश्मीरच्या शोपिया मध्ये काल सुरक्षादलाने एक प्रेशर कुकर आईईडी जप्त केली असून त्यामुळे राज्यातील सुरक्षेत वाढ झाली आहे.
काश्मीरमध्ये घातपात घडवण्यासाठी पेरण्यात आलेला एक प्रेशर कुकरमधे आईईडी सुरुंग काश्मीरच्या दक्षिण भागातील जेनपोरा शोपिया येथून जप्त करण्यात आला आहे. शोपिया पाठोपाठ पुलवामा येथील पिंगलिश नागवाडी भागातूनही एक भूसुरुंग जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर हे मार्ग बंद करण्यात आले. बॉम्बविरोधी पथकाने हे दोन्ही सुरुंग निकामी केले. गेल्या काही दिवसांपासून भारतीय लष्कर व सुरक्षा दलांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु आहे.
काश्मीरमध्ये दोन ठिकाणी स्फोटके जप्त! सुरक्षेत वाढ
