श्रीनगर – संपूर्ण काश्मीर खोऱ्यात कालपासून झालेल्या प्रचंड बर्फवृष्टीमुळे जनजीवन आजही विस्कळीत झाले. रस्त्यांवर बर्फाची जाडजूड थर साचल्याने वाहतूक ठप्प झाली.श्रीनगर विमानतळावरून होणारी विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. श्रीनगरमध्ये या मोसमातील पहिली बर्फवृष्टी आज झाली. त्यामुळे श्रीनगर – जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.दक्षिण काश्मीरमधील पठारी भागांत तीव्र ते अतितीव्र बर्फवृष्टी झाली आहे. मध्य काश्मीरच्या पठारी भागांत मध्यम स्वरूपाची बर्फवृष्टी तर उत्तर काश्मीरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाची बर्फवृष्टी झाली.शुक्रवारी रात्री श्रीनगरचे तापमान उणे १ एवढे नोंदविले गेले.
काश्मिरात तुफान बर्फवृष्टी रस्ते बंद! विमान सेवा खंडित
![](https://navakal.in/wp-content/uploads/2024/12/snowfall-in-kashmir-disrupts-flight-operations.jpg)