बंगळूरू- कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यातील येल्लापुरा येथे आज सकाळी एक ट्रक ५० मीटर खोल दरीत कोसळला. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी १५ जण गंभीर जखमी झाले. कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यातील यालापुरा महामार्गावर हा भीषण अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक भाजीपाला आणि फळे येल्लापूर येथे भरणाऱ्या जत्रेसाठी घेऊन जात होता. यामध्ये ट्रकमध्ये २५ हून अधिक जण प्रवास करत होते. पहाटे पाच वाजताच्या सुमारास सावनूर-हुबळी महामार्गावर हा ट्रक ट्रिपरवर आदळला. त्यानंतर ५० मीटर दरीत कोसळला. या अपघातामध्ये ट्रकमधून प्रवास करणाऱ्या फैयाज इमाम साब जमखंडी (४५), वसीम विरुल्ला मुदगेरी (३५), एजाज मुस्तका मुल्ला (२०), सादिक भाषा फराश (३०), गुलाम हुसेन जावली (४०), इम्तियाज मामजफर मुलाकेरी (३६), अल्पाज जाफर मंदाक्की (२५), जिलानी अब्दुल जाखती (२५) आणि अस्लम बाबुली बेनी (२४) यांचा जागीच मृत्यू झाला. तर उपचारादरम्यान हुबळी येथील रुग्णालयात आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या अपघातात १५ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर हुबळी येथील किम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्व व्यापारी हावेरी जिल्ह्यातील सावनुरू शहरातील रहिवासी होते