अमेरिकेत पुन्हा भडकला वणवा! पन्नास हजार लोकांचे स्थलांतर

लॉस एंजलीस – अमेरिकेच्या कॅलिफोर्निया इथे लागलेला वणवा कालपासून पुन्हा भडकला असून जोरदार वाऱ्यामुळे हा वणवा विझवणेही कठीण झाले आहे. कॅलिफोर्नियाच्या प्रशासनाने काल पन्नास हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. लॉस एंजिलसच्या उत्तरेकडील डोंगरांवर ही आग झपाट्याने पसरली. त्यातच या भागात जोरदार वारे वाहात असल्याने ती पुन्हा शहरांकडे आली. या आधी लागलेले दोन मोठे वणवे अद्यापही भडकत आहेत. त्यांना विझवणे आता अशक्य झाले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

काल सकाळपासून ह्युजेस फायर या नावाचा वणवा पुन्हा भडकला. त्याने काही तासातच ३९ चौरस किलोमीटरचा भूभाग आपल्या ताब्यात घेतला. येथील झाडी झुडपं आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून कास्टिल सरोवराच्या जवळ काळ्या धुरांचे लोट उठले आहेत. या भागात सलग तीन आठवड्यापासून हा वणवा पेटला आहे. ३१ हजारांहून अधिक लोकांना घरे खाली करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या भागातील पाच देशांतर्गत महामार्ग बंद करण्यात आले आहेत. अग्निशमन दल या आगीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असून विमानांमधून रसायनांचा फवारा करुन आग पसरु नये याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शनिवारपासून या भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे त्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यात मदत होईल अशी अपेक्षा हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top