नागपूर – एका रानडुकराने दुचाकीला जोरात धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.ही भीषण दुर्घटना नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील देवळी (काळबांडे) येथे घडला.
या अपघातातील मृत दुचाकीस्वाराचे नाव मोहन लक्षणे (२१) असे आहे. मोहन लक्षणे हा आज सकाळी आपल्या दुचाकीवरून कामाला चालला होता. त्यावेळी वाटेत रानडुकरांचा कळप आडवा आला असता एका रानडुकराने त्याच्या दुचाकीला जोरात धडक दिली.डुकराच्या धडकेने जमिनीवर कोसळलेल्या मोहनच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.