मुंबई – राज्यभरात उष्णतेचा कहर सुरू झाला असून पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये झाली.मुरबाडमध्ये दुपारच्या सुमारास ४२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दुसरीकडे विदर्भ होरपळून निघत आहे.ठाणे जिल्ह्यात मुरबाडखालोखाल डोंबिवलीजवळील पलावा परिसरात ४१.३ अंश सेल्सिअस तर उल्हासनगर, कल्य़ाण, डोंबिवली आणि मुंब्रा या शहरांत ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.प्रादेशिक हवामान खात्याने विदर्भात उष्णतेची लाट आल्याचे जाहीर केले आहे. काल ब्रम्हमुरी सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेले काही दिवस विदर्भातील बहुतांश शहरांमधील तापमान ४० अंशाच्या पार गेले आहे.काल बुलडाणा, गडचिरोली, वाशीम आणि गोंदिया वगळता अन्य शहरांतील तापमान ४० अंशांहून जास्त होते.
राज्यात उष्णतेचा कहर सुरू तापमान ४२ अंशांच्या पार
