कोल्हापूर – अजित पवार गटाच्या सदस्य नोंदणीसाठी कोल्हापुरात खास गुलाबी गाड्या फिरत आहेत. कागल तालुक्यातून अजितपर्व युवा जोडो अभियानाला सुरुवात झाली आहे. या गाडीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांचे फोटो लावण्यात आले आहेत.
कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेच्या वेळेस गुलाबीचे जॅकेट परिधान केले होते. त्यामुळे विधानसभेत चांगले यश मिळाले. त्यामुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गुलाबी गाड्यांच्या माध्यमातून सदस्य नोंदणी करण्याचा निर्णय घेतला. आम्ही २५ -३० गुलाबी गाड्या घेऊन कोल्हापुरात सदस्य नोंदणीसाठी फिरणार आहोत.
सदस्य नोंदणीसाठीखास गुलाबी गाड्या
