मुंबई – राज्यात डे केअर केमो थेरपी केंद्र सुरु होणार आहेत. यासंदर्भात आज विधानसभेत राज्यातील कर्करोगांच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी जिल्हास्तरावर आरोग्य विभागाच्या रुग्णालयात “डे केअर केमो थेरपी केंद्र” सुरु करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
यावर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी माहिती दिली की, राज्यात डे केअर केमो थेरपी सेंटर हे टप्प्या टप्प्याने सुरु केले जाणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात रत्नागिरी, सातारा, गडचिरोली, नाशिक, अमरावती, पुणे, धाराशिव, बीड, अकोला या ९ जिल्हा रुग्णालयात सेंटर्स सुरु होणार आहेत. सध्या लातूरला विवेकानंद कर्करोग रुग्णालयाच्या मार्फत केमो थेरपी आरोग्य सेवा सुरु आहे. हे रुग्णालय टर्शरी कॅन्सर केअर सेंटर योजनेअंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाशी संलग्न आहे.
राज्यात डे केअर केमोथेरपी केंद्र सुरु होणार
