मुंबई- यंदा होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांनी कडक नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये महिलांना लक्ष्य करून आणि अनोळखी व्यक्तींवर फुगे मारणाऱ्या व अश्लील शब्द वापरणाऱ्यांवर पोलीस कडक कारवाई करणार आहेत.
आज बुधवार १२ मार्च ते १७ मार्चपर्यंत मुंबई पोलिसांची ही नियमावली लागू राहणार आहे. रमजानचा महिना लक्षात घेऊन ही खबरदारी घेण्यात आली आहे. होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीच्या दिवशी अश्लील शब्द किंवा घोषणांचे सार्वजनिक उच्चारण किंवा अश्लील गाणी, अश्लील हावभाव किंवा नक्कलचा वापर आणि चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू किंवा गोष्टींचे, प्रदर्शन किंवा प्रसार करण्यास मनाई करण्यात आली आहे. पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, रंग किंवा पावडर फवारणे किंवा फेकणे असे कृत्य करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार आहेत.
रंगीत किंवा साध्या पाण्याने किंवा कोणत्याही द्रवाने भरलेले फुगे तयार करणे किंवा फेकणे, त्याचप्रमाणे होळी व रंगपंमी निमित्त जबरदस्ती वर्गणी मागणार्यावरही कारवाई केली जाणार आहे.
यंदा होळी, धूलिवंदनदिवशीफुगे मारणाऱ्यांवर कारवाई
