ग्रेटर नोईडा – गुगल मॅपवर पूर्णपणे विसंबून राहाणे कसे धोकादायक आहे याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.ग्रेटर नोईडामध्ये गुगल मॅपने दिलेल्या चुकीच्या मार्गामुळे एक भरधाव कार थेट तीस फूट खोल नाल्यात जाऊन कोसळली. सुदैवाने स्थानिकांच्या मदतीने कार नाल्यातून बाहेर काढण्यात आली.या घटनेत कारमधील सर्व प्रवासी सुखरूप वाचले.
या कारमध्ये असलेल्या तरुणांनी सांगितले की, आम्ही केंद्रीय विहार सोसायटीच्या समोरील कासना रोड चौकाच्या दिशेने चाललो होतो.गुगल मॅपच्या आधारे आम्ही चाललो होतो. गाडी वेगात असल्याने पुढे रस्ता अपूर्ण असल्याचे लक्षात आले नाही.गाडी थेट हवालिया नाल्यात कोसळली.
हा अपघात घडला तेव्हा तेथून चाललेल्या दोन डिलिव्हरी बॉयजनी प्रसंगावधान दाखवत गाडीच्या काचा फोडून आतील तीन तरुणांना गाडीतून बाहेर काढले.
गुगल मॅपने धोका दिला कार नाल्यात कोसळली
