भुवनेश्वर- ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील एका गावात एक अस्वल मोहाची फुले तोडण्यासाठी मोहाच्या झाडावर चढत होते.त्यावेळी अचानक विजेचा शॉक लागून या अस्वलाचा जागीच मृत्यू झाला.
हे अस्वल अन्नाच्या शोधात जंगलातून गावात शिरले होते.यावेळी त्याची नजर मोहाच्या फुलांवर पडली आणि ते ती तोडण्यासाठी झाडावर चढत होते.झाडावर चढत असतानाच त्याला विजेचा धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सकाळी ग्रामस्थांनी ट्रान्सफॉर्मरवर अस्वलाचा मृतदेह पाहिल्यावर त्यांनी वीज विभाग आणि वन विभागाला माहिती दिली. वीज विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अस्वलाचा मृतदेह ट्रान्सफॉर्मरवरून काढला.