रीवा-मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यात प्रयागराज महाकुंभासाठी जाणार्या भाविकांची गाडीकाल मध्यरात्री ३० फूट खोल दरीत कोसळली.त्यात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला,तर ४ जण गंभीर जखमी झाले.जखमींना रीवा येथील संजय गांधी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सुजीत यादव,प्रमोद यादव,संदीप साहू आणि रमाकांत साहू अशी मृतांची नावे आहेत. सिंगरौली जिल्ह्यातील जयंत येथील ८ भाविक गाडीने प्रयागराजला जात होते. भाविकांची गाडी सीधी जिल्ह्यात येताच अनियंत्रित झाली आणि ती ३० फूट खोल दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की, गाडीचा चेंदामेंदा झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांनी तत्काळ जखमींना रूग्णालयात दाखल केले.मात्र डॅक्टरांनी त्यातील चार जणांना मृत घोषित केले.
महाकुंभाला जाताना गाडीदरीत कोसळली!चौघांचा मृत्यू
