वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सहकारी एलॉन मस्क यांच्याविरुद्ध अमेरिकेतील १४ राज्यांनी वॉशिंग्टन येथील एका न्यायालयात खटला दाखल केला. ट्रम्प यांनी मस्क यांना डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सीचे प्रमुख बनवले आहे. हा सर्वप्रकार अमेरिकन संविधानाचे उल्लंघन करण्यासारखेच असल्याचा आरोप या राज्यांनी केला.
न्यू मेक्सिको, अॅरिझोना, कॅलिफोर्निया, कनेक्टिकट, हवाई, मेरीलँड, मॅसॅच्युसेट्स, मिशिगन, मिनेसोटा, नेवाडा, ओरेगॉन, रोड आयलंड, व्हरमाँट आणि वॉशिंग्टन या राज्यांनी हा खटला न्यायालयात दाखल केला आहे. नेवाडा आणि व्हरमाँट या राज्याचे ट्रम्प हे गव्हर्नर आहेत. या खटल्यात या राज्यांनी म्हटले की, मस्क यांना सरकारी कर्मचारी काढून टाकण्यासाठी आणि एकाच वेळी संपूर्ण विभाग रद्द करण्यासाठी अधिकार देण्यात आले आहेत. हे देशासाठी धोकादायक ठरणार आहे. देशाचे भवितव्य हे निवडून न आलेल्या व्यक्तीकडे जाणे म्हणजेच संविधानाचे उल्लंघन करण्यासाऱखे आहे.