वॉशिंग्टन – अवघ्या आठ दिवसांच्या मोहिमेवर अवकाश स्थानकावर गेलेली आणि आठ महिन्यांहून जास्त दिवस तिथेच अडकून पडलेली सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन अंतराळवीर पृथ्वीवर कधी येणार याचे उत्तर एकदाचे मिळाले आहे. स्वतः सुनिता विल्यम्स यांनीच त्या १२ मार्च रोजी पृथ्वीवर परतणार अशी माहिती दिली. जगभरातील खगोलप्रेमींचे डोळे या अंतराळवीरांच्या परतीच्या प्रवासाकडे लागले आहेत. हे अंतराळवीर जरी १२ मार्च रोजी पृथ्वीवर उतरणार असले तरी त्यांना सुमारे आठवडाभर स्पेस कॅप्सूलमध्येच राहावे लागणार आहे. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यासाठी त्यांना तसे करावे लागणार आहे.
तारीख ठरली ! सुनिता विल्यम्स १२ मार्च रोजी पृथ्वीवर परतणार
