मुंबई – यंदाच्या अर्थसंकल्पात पालिकेने एक हजार कोटींचे अनुदान देण्याचे घोषित केले आहे, पण ही रक्कम अपुरी आहे. त्यामुळे बेस्टचे तिकीटदर वाढवण्याच्या विचारात प्रशासन आहे. तिकीट दर वाढवण्या ऐवजी बेस्टला ५ ते ६ हजार कोटींचे अनुदान तातडीने देण्यात यावे अशी मागणी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
बेस्ट १ हजार कोटीच्या या निधीमधून निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी, नवीन बस खरेदी, वेतन, कर्ज परतफेड करणार आहे. ही रक्कम अपुरी पडत आहे. या पार्श्वभूमीवर बेस्ट प्रशासनाकडून उत्पन्न वाढीसाठी तिकिटांच्या दरात वाढ करण्याचा हालचाली सुरु आहेत. दरवाढ ऐवजी पालिकेने बेस्टला अनुदान वाढवून द्यावे, अशी मागणी बेस्ट कामगार सेनेची आहे.
बेस्टचे अनुदान वाढवासुहास सामंतांची मागणी
