नवी दिल्ली- अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पायाभरणीची पहिली वीट रचणारे कामेश्वर चौपाल यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन झाले. कामेश्वर चौपाल श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे सदस्य बिहारचे माजी विधान परिषद सदस्यही होते. दीर्घकाळापासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात उपचार सुरू होते. काल मध्यरात्री उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कामेश्वर चौपाल यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तसेच विश्व हिंदू परिषदेने त्यांना पहिल्या कारसेवकाचा दर्जा दिला होता. ९ नोव्हेंबर १९८९ रोजी अयोध्येत राम मंदिराच्या पायाभरणी समारंभात पहिली वीट रचण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता. त्यावेळी देखील ते विहिंपचे सहसचिव होते. यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले होते.
अयोध्याची पहिली वीट रचणारे कामेश्वर चौपालांचे निधन
