नवी मुंबई – नवी मुंबई मेट्रोचा बेलापूर ते पेंधर प्रवास अवघ्या १५ मिनिटांत पूर्ण होणार आहे.सध्या नवी मुंबई मेट्रोचा ताशी वेग २५ प्रति किलोमीटर इतका आहे. आता हा वेग वाढून ताशी ६० प्रति किलोमीटर होणार आहे.
नवी दिल्लीच्या रेल्वे सुरक्षा विभागाने बेलापूर ते पेंधर या मेट्रो मार्गिकेवरील वेगाची चाचणी केली. त्यामुळे लवकरच नवी मुंबई मेट्रो ताशी ६० प्रति किलोमीटर या वेगाने धावणार आहे. पुढील दीड महिन्यात वेग चाचणीचे प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे. या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. त्यानंतर या मार्गावर २० जानेवारी २०२५ पासून सुधारित वेळापत्रक लागू करण्यात आले. त्यानुसार सकाळी आणि सायंकाळी सर्वाधिक गर्दीच्या वेळी दर १० मिनिटांनी मेट्रो धावत आहे.