वैजापूर – छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील कविटखेडा शिवारात आज सकाळी आपल्या आईसोबत कापूस वेचणीसाठी गेलेल्या ५ वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला.या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. महेश सिद्धार्थ आखाडे (५)असे मृत मुलाचे नाव आहे.सकाळी महिला आपल्या मुलाला घेऊन शेतात कापूस वेचणीसाठी गेले होते. शेताच्या वेशीवर मुलाला बसवून महिला शेतात कामासाठी गेले असता मुलावर बिबट्याने हल्ला केला. यात मुलगा जागीच ठार झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. घटनास्थळी पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी दाखल झाले आणि बिबट्याला जेरंबद करण्याचे प्रयत्न सुरू केले.
वैजापुरात बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू
![](https://navakal.in/wp-content/uploads/2024/10/leopard.jpeg)