रायपूर – अदानी ग्रुपचे प्रमुख गौतम अदानी, छत्तीसगडच्या ऊर्जा प्रकल्पांमध्ये ६५ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहेत. काल त्यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांच्याशी भेट घेऊन याविषयी चर्चा केल्याची माहिती जनसंपर्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
गौतम अदानी यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यानुसार अदानी रायपूर, कोरबा आणि रायगड जिल्ह्यात ऊर्जा प्रकल्प उभारणार असून त्यामुळे छत्तीसगडमध्ये अतिरिक्त ६,१२० मेगावॉट ऊर्जेची अतिरीक्त निर्मिती होणार आहे. अदानी छत्तीसगडच्या सिमेंट निर्मिती प्रकल्पाच्या विकासासाठीही ५००० कोटींची गुंतवणूक करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरुन अदानी राज्यातील आरोग्य, मनुष्यबळ विकास आणि पर्यटन विकासासाठी सामाजिक दायित्व निधीतून १० हजार कोटी देणार आहेत. अदानी व मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत संरक्षण सामुग्री निर्माण व डाटा सेंटरची तसेच जागतिक दर्जाच्या केंद्राची ऊभारणी करण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.