हैद्राबाद – हैद्राबाद येथील एका सिनेमागृहात झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आरोपी असलेला दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जून याला परदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याला दर रविवारी चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यातूनही सवलत देण्यात आली आहे.
अभिनेता अल्लू अर्जून याच्या उपस्थितीनंतर हैद्राबादच्या संध्या सिनेमागृहात चेंगराचेंगरी झाली होती. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्याला १३ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला जामीन मिळाला होता. मात्र विदेशात न जाण्याची तसेच पोलीस ठाण्यात दर रविवारी हजेरी लावण्याची अट टाकण्यात आली होती. याविरोधात त्याने हैद्राबादच्या नामपल्ली न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने त्याला या दोन्ही अटींबाबत दिलासा दिला आहे.