भिवंडी – भिवंडी तालुक्यातील वळपाडा ग्रामपंचायत हद्दीतील भंगारांना गोदामाला आग लागली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.या आगीत ४ ते ५ भंगाराची गोदामे जळून खाक झाली.
आगीची माहिती मिळताच अग्निशमनच्या दलाच्या गाड्या दाखल झाल्या. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. गोदामात कागदांची रद्दील असल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली. आगीचे कारण मात्र अद्याप कळू शकले नाही.
भिवंडीत भंगाराच्या गोदामांना आग
![](https://navakal.in/wp-content/uploads/2025/01/WhatsApp-Image-2025-01-10-at-6.55.05-PM.jpg)