पालघर – पश्चिम रेल्वेच्या डहाणू आणि घोलवड रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटली. यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. पश्चिम रेल्वेने मेल आणि एक्सप्रेस गाड्याचे वेळापत्रकात बदल केले. त्यानंतर गाड्या एक ते दीड तास रेल्वे गाड्या उशिराने धावत असल्यामुळे अनेक रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली होती. गुजरात,पालघर, डहाणूहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. रेल्वे प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत दुरुस्तीचे काम सुरु केले. पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |