बीजिंग-गेल्या काही दशकामध्ये चीनने संरक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड सुधारणा केली आहे.चीनने शस्त्रास्त्रांच्या अद्ययावतीकरण आणि आधुनिकीकरणासाठी पाण्यासारखा पैसा ओतला आहे.आता तर चीनने जगातील सर्वांत शक्तिशाली मशिनगनची निर्मिती केली. चीनची ‘मेटल स्टॉर्म’ ही नवीन मशिनगन बुलेट ट्रेनच्या वेगाने कार्य करते.या मशिनगनमध्ये मिनिटाला तब्बल ४.५० लाख गोळ्या झाडण्याची क्षमता आहे.
सध्या अमेरिकेकडे असलेली ‘फालानाक्स सिस्टीम ‘ ही आपल्या मशिनगनमधून मिनिटाला साडेचार हजार गोळ्या झाडते. हीच मशीन सध्या जगात सर्वांत शक्तिशाली मशिनगन म्हणून ओळखली जाते.मात्र आता चीनने अमेरिकेला मागे टाकत आपली ‘मेटल स्टॉर्म’ ही सर्वांत शक्तिमान मशिनगन मशिनगन जगासमोर आणली आहे.या मशीनगनमध्ये चिनी शास्त्रज्ञांनी कॉन्टक्सलेस इलेक्ट्रॉनिक्स ट्रिगर दिला आहे.या ट्रिगर गोळ्यामुळे धातूची तार वितळू शकते. त्यातून उच्च क्षमतेची ऊर्जा निर्माण होते. त्यामुळेच मिनिटाला साडेचार लाख गोळ्या झाडल्या जाऊ शकतात.इलेक्ट्रिकल अभियांत्रिक विभागाचे सहाय्यक प्राध्यापक ल शुताओ व त्यांचे पथक यावर काम करत आहे. ‘मेटल स्टॉर्म’ मशीनगन ज्या संकल्पनेवर बनली आहे. त्याचा शोध ९० च्या दशकात ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ माइक डायर यांनी लावला होता.त्यांच्या संकल्पनेनुसार, मशीनगनमध्ये ३६ बॅरल लावावे लागले असते. प्रत्येक बॅरलमधून १० लाखांहून अधिक गोळ्या झाडता आल्या असत्या.