मिरज – आरग येथील प्रसिद्ध पद्मावती मातेच्या गाभाऱ्यातून १८ तोळे सोन्याची चोरी झाली. मंदिराचे पुजारी सकाळी पूजाअर्चा करण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीस आला. मंदिराच्या पुजाऱ्याने याबाबत मिरज पोलिसांत तक्रार दिल्यावर त्यांनी मंदिर परिसरात पाहणी केली. त्यानंतर श्वान पथकासह, एलसीबी, फॉरेन्सिक लॅबचे पोलीस दाखल झाले होते. मिरज पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, काल मध्यरात्री दीडच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या बाजूस असणाऱ्या जिन्याने मंदिरात प्रवेश केला. त्यांनी गाभाऱ्यात प्रवेश करून सुमारे १८ तोळे सोने लंपास केले.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |