मुंबई – बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याचे दोन मजले वाढवण्यास राज्याच्या पर्यावरण विभागाने मंजुरी दिली आहे. शाहरुखचा वांद्रे येथील हा बंगला नेहमीच विविध कारणांनी चर्चेत राहिला आहे.माउंट मेरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरचा हा बंगला शाहरुखच्या चाहत्यांसाठीही आकर्षणाचा विषय आहे.सध्या सहा मजली असलेल्या या बंगल्याचे आणखी दोन मजले वाढवले जाणार आहेत. या दोन मजल्यांसाठी परवानगी देण्यासाठी शाहरुख खान याची पत्नी गौरी खान यांनी महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापनाकडे अर्ज केला होता. त्या अर्जाला आता मंजुरी देण्यात आली आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |