लंडनमध्ये ब्रिटिशांपेक्षा भारतीयांची जास्त संपत्ती

लंडन- ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांची संपत्ती दिवसेंदिवस वाढत असून आता लंडनमध्ये राहणाऱ्या व्यक्तींमध्ये ब्रिटिशांपेक्षा जास्त मालमत्ता भारतीय व्यक्तींच्या नावावर आहे, अशी माहिती एका अहवालातून समोर आली आहे. लंडनमधील एका प्रॉपर्टी डेव्हलपरने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला असून यात हा दावा केला आहे.

लंडनमधील सर्वात जास्त मालमत्तेचे मालक हे आता तेथे राहणारे भारतीय आहेत. बॅरेट लंडनने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये लंडनमधील भारतीय नागरिक मालमत्ता खरेदीदारांना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागले गेले आहे. यामध्ये पिढ्यान्पिढ्या ब्रिटनमध्ये राहणारे भारतीय वंशाचे रहिवासी, एनआरआय, परदेशी गुंतवणूकदार आणि शिक्षणासाठी स्थलांतरित लोकांचा समावेश आहे. आता ब्रिक्स न्यूजने सुद्धा ही बातमी दिली आहे. लंडनच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये भारतीयांचा दबदबा निर्माण झाला आहे. रिअल इस्टेटच्या बाबतीत भारतीयांनी ब्रिटीशांना मागे टाकले आहे. मालमत्तेच्या मालकीच्या बाबतीत ते पहिल्या स्थानावर आहेत. अपार्टमेंट आणि घरे खरेदीसाठी भारतीय लंडनमध्ये ३ ते ४.७ कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहेत. भारतीय नागरिकांनंतर मालमत्ताधारकांमध्ये ब्रिटिश आणि नंतर पाकिस्तानी लोकांचा नंबर लागतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top