अहमदाबाद – अहमदाबादवासियांना लवकरच अंबाजी देवस्थानपर्यंत थेट रेल्वेने जाणे शक्य होणार आहे. अहमदाबाद -अंबाजी यांना जोडणाऱ्या नव्या रेल्वेमार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. सन २०२७ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे २० टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे.सध्या अहमदाबादहून अंबाजी देवस्थानाला केवळ रस्तेमार्गाने जाता येते. मात्र आता ११६ किलोमीटर लांबीच्या या नव्या रेल्वेमार्गामुळे प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेत मोठी बचत होणार आहे.हा रेल्वे मार्ग गुजरातमधील सहा नद्यांना ओलांडून जातो. तसेच ६० गावांना जोडणारा हा मार्ग आहे.गुजरातच्या मेहसाणा, बनासकांटा, साबरकांटा आणि राजस्थानच्या सिरोही या महत्वाच्या जिल्ह्यांमधून जाणाऱ्या या रेल्वेमार्गामुळे छोट्या-मोठ्या १०४ खेडगावांना अप्रत्यक्षपणे लाभ होणार आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |