वसई- पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार ते नालासोपारा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळ वाकल्यामुळे काल दुपारी मोटारमनने प्रसंगावधान राखत वातानुकूलित लोकल थांबवली.त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दीड ते दोन तास ही लोकल थांबल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला काही प्रवाशांनी चालत विरार आणि नालासोपाराचे स्थानक गाठले.या घटनेमुळे विरार ते नालासोपाराची जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवली होती. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी दुरुस्ती करण्यासाठी दाखल झाले आणि चार तासांनी रेल्वे कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम पूर्ण केले आणि या जलद मार्गावरील प्रवासी रेल्वे वाहतूक सेवा सुरळीत झाली.
विरारजवळ रेल्वे रुळ वाकला वाहतूक दोन तास खोळंबली
![](https://navakal.in/wp-content/uploads/2025/01/WhatsApp-Image-2025-01-01-at-2.42.31-PM.jpg)