आंतरराष्ट्रीय पदक विजेता ओला चालवतो ! तरुणाची पोस्ट

मुंबई- माजी ऑलिंपिक पदक विजेता पराग पाटील मुंबईत ओला चालवत असल्याचे एका तरुणाला आढळले. त्यांच्याबरोबरचा फोटोही त्याने पोस्ट केला आहे. आर्यन सिंह कुशवाह यांनी काल एक ओला बूक केली. ओलाने आपल्या निर्धारित ठिकाणी जात असतांना गप्पा मारताना त्याच्या हे लक्षात आले की आपला ओलाचालक हा माजी ऑलिंपिक खेळाडू आहे. त्याने त्यानंतर त्यांच्या बरोबरचा फोटो समाजमाध्यमांवर पोस्ट केला. ओलाचालक पराग पाटील हे ज्येष्ठ ऑलिंपिक खेळाडू असून तिहेरी उडी ट्रिपल जम्प या प्रकारात त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत २ सुवर्ण, ११ रौप्य व ३ कांस्य पदके पटकावली आहेत. ज्या ज्या वेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले त्या त्या वेळी त्यांनी पदक पटकावले आहे. त्यानंतर कोणी प्रायोजक नसल्याने त्यांनी आपला खेळ थांबवत चरितार्थासाठी ओला चालकाचे काम स्विकारले .

कुशवाह यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, पराग पाटील यांच्याकडे कुटुंबाच्या चरितार्थाएवढे पैसे असले तरी आपला खेळ पुन्हा सुरु करण्यासाठी त्यांना मदतीची आवश्यकता आहे. त्यावर अनेकांनी पराग पाटील यांच्या मदतीसाठी पुढे येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माजी खेळाडूंना चरितार्थासाठी काय काय करावे लागते हे अनेकदा दिसून आले होते. कोणाला भाजी विकायला लागत आहे तर कोणी घरगुती काम करत आहे. त्यातच एका खेळाडूला चरितार्थासाठी ओला चालवायला लागण्याने देशात खेळ व खेळाडूंना कशी वागणूक मिळते हे उघड झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top