मुंबई-३१ डिसेंबरच्या रात्री नववर्ष स्वागतासाठी गेट वे आफ इंडिया, जूहू चौपाटी, गोराई बीच, मार्वे बीच आणि मुंबईतील इतर समुद्र किनार्यावर रात्रीच्या वेळी येणार्या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट विविध बसमार्गांवर २५ जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. आवश्यकता भासल्यास अधिक बसगाड्या सोडण्यात येतील.प्रवाशांसाठी बेस्टतर्फे डॅा.श्यामाप्रसाद मुखर्जी चौक जूहू चौपाटी, गोराई बीच आणि चर्चगेट स्थानक पूर्व आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इ ठिकाणी वाहतूक अधिकारी आणि बसनिरिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. ए-२१ – श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते देवनार आगार, सी-८६ श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते वांद्र बसस्थानक(पश्चिम),ए ११६ – श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ए ११२ – श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते अहिल्याबाई होळकर चौक,(चर्चगेट), २०३ – अंधेरी स्टेशन पश्चिम ते जुहू बीच, २३१ सांताक्रुझ स्टेशन पश्चिम ते जुहू बस स्टैंड, ए २४७ – बोरीवली स्टेशन पश्चिम ते गोराई बीच, ए २९४ – गोराई बीच ते बोरीवली स्टेशन पश्चिम, २७२- मालाड स्टेशन पश्चिम ते मार्वे बीच या मार्गावर बस धावणार आहेत.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |