महाबळेश्वर – महाबळेश्वर आणि पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणची सफर ज्या मॅप्रो गार्डनला भेट दिल्याशिवाय अधुरी वाटते त्या सुप्रसिद्ध मॅप्रो गार्डनला महाबळेश्वरच्या तहसिलदारांनी लायसन्स नसल्याने नोटीस पाठविली आहे.
महाबळेश्वरच्या तहसिलदार तेजस्विनी पाटील यांनी मॅप्रो कंपनीला ही नोटीस पाठविली आहे. कंपनीकडे आवश्यक परवाना नसल्याने कठोर कारवाई करण्याचा इशारा या नोटिसीद्वारे देण्यात आला आहे. या नोटिसीमुळे खळबळ उडाली आहे. पाचगणीलगत गुरेघर परिसरात मॅप्रो गार्डन आहे.