मेलबर्न – नितीश कुमार रेड्डीचे कुटुंबीय आणि सुनील गावस्कर यांच्या मेलबर्नमधील भेटीचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात नितीशचे वडील सुनील गावसकर यांच्या पायावर डोके ठेवून अभिवादन करत असल्याचे दिसत आहे.
नितीश रेड्डीच्या शतकाचे सर्वच माजी खेळाडूंनी कौतुक केले. रेड्डीच्या शतकाच्या वेळी सुनील गावसकर कॉमेंट्री करत होते. नितीशचे शतक पूर्ण होताच त्यांनी उभे राहून टाळ्या वाजवत त्याचे अभिवादन केले. दिवसाच्या खेळ संपल्यावर नितीशच्या कुटुंबीयानी गावसकर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नितीशचे वडील भावुक झाले. त्यांनी गावसकर यांच्या पायाला स्पर्श करून त्यांना अभिवादन केले. यावेळी, नितीश रेड्डीच्या बहिणीनेही गावसकर यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. यावेळी सुनील गावस्कर यांनी नितीश कुमार रेड्डी आणि त्याच्या फलंदाजीबद्दल कुटुंबियांशी चर्चा केली.
यावेळी गावस्कर म्हणाले की, नितीशच्या वडिलांचा संघर्ष मला माहीत आहे. त्यांनी किती त्याग केला आहे हेदेखील माहित आहे. त्यांच्यामुळे भारतीय क्रिकेटला नवा हिरा मिळाला आहे.