महाराष्ट्राला स्थान नाही
पणजी – प्रजासत्ताक दिनादिवशी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर होणाऱ्या संचलनाची मोठी चर्चा होत असते. गेल्यावर्षी या निमित्ताने कर्तव्यपथावर होणाऱ्या संचालनामध्ये गोव्याला संधी मिळाली नव्हती, पण यावर्षी गोव्याला संधी मिळाली आहे.यंदाच्या वर्षी कर्तव्यपथावर होणाऱ्या संचालनामध्ये १५ राज्यांचा समावेश असून यामध्ये आपल्या गोव्याला देखील स्थान मिळाले आहे.यावेळी महाराष्ट्राची संधी मात्र हुकली आहे.
कर्तव्यपथावर होणाऱ्या संचालनामध्ये गोव्यासोबत सामील होणाऱ्या राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, चंडीगड, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि हरियाणा या राज्यांचा समावेश झाला आहे.७५ व्या प्रजासत्ताक दिनी स्त्री शक्तीचे दर्शन घडणार आहे. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र,तेलंगणा, तामिळनाडू आणि तेलंगणा यांना यादीत स्थान मिळालेले नाही. प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या या संचलनात आपल्या राज्याला स्थान मिळावे अशी अनेकांची इच्छा असते आणि यावरून वाद देखील होतात. हे वाद लक्षात घेऊन किमान तीन वर्षांमधून एकदा संधी मिळावी म्हणून संरक्षण मंत्रालयाने नवीन नियम जारी केला आहे. शिवाय या निमित्ताने बसलेल्या निवड समितीला हा चित्ररथ पटणे ही अट देखील प्रमुख अटींमध्ये सामील करण्यात आली आहे.