धाराशिव – नाताळ आणि नविन वर्ष स्वागताच्या सुट्याच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर संस्थानने पहाटे एक वाजता मंदिर उघडण्याचा निर्णय घेतला आहे.नवीन वर्षात १ जानेवारीपर्यंत मंदिर पहाटे एक वाजता उघडण्यात येणार असल्याचे असल्याचे मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तहसीलदार माया माने यांनी काढले आहेत.
नाताळच्या सुट्या, नवीन वर्ष तसेच लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर तुळजाईनगरीत भाविकांची गर्दी होत आहे. आगामी आठ दिवस १ जानेवारी भाविकांची गर्दी कायम राहणार असून या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानने तुळजाभवानी मंदिर २२ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला.यानुसार १ जानेवारीपर्यंत मंदिर पहाटे १ वाजता उघडण्यात येणार असून अभिषेक पूजा सकाळी ६ वाजता होणार आहे.मंदिर संस्थानच्या या निर्णयाचे पुजारी, भाविकांतून स्वागत करण्यात येत आहे.२५ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत मंदिर पहाटे १ वाजता चरणतीर्थ पूजा होऊन मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. तर रात्री १०.३० च्या सुमारास प्रक्षाळ पूजेनंतर मंदिर बंद करण्यात येणार आहे.