दिल्ली – प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ अवध ओझा यांनी आज अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. ते दिल्लीतील कोणत्याही जागेवरून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मूळचे उत्तर प्रदेशातील गोंडा येथील अवध ओझा हे युपीएससी शिक्षक आहेत.
अवध ओझा यांच्या पक्ष प्रवेशावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले की, क्षेत्रातील दिग्गज अवध ओझा आज आम आदमी पक्षाच्या कुटुंबाचा भाग बनत आहेत. आमचे प्रयत्न पुढे नेण्यासाठी आप परिवारात त्यांचे स्वागत आहे. तर अवध ओझा म्हणाले की, माझा पक्ष प्रवेशाचा मुख्य अजेंडा शिक्षणक्षेत्राचा विकास हा आहे. अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांनी मला राजकारणात प्रवेश करण्याची आणि शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी दिली आहे. माझ्या राजकीय कारकिर्दीची ही सुरुवात आहे. माझे मुख्य लक्ष्य शिक्षण क्षेत्राच्या विकासावर असेल.