नंदुरबारमध्ये तीन सख्खे भाऊविधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

नंदुरबार-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नंदुरबारमध्ये पुन्हा एकदा आगळावेगळा विक्रम घडत आहे. तीन सख्खे भाऊ एकाच जिह्यातून तीन वेगवेगळ्या मतदारसंघांतून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गावित कुटुंबातील ही तीन सख्खी भावंडे आहेत. डॉ.विजयकुमार गावित, राजेंद्रकुमार गावित आणि शरद गावित अशी त्यांची नावे आहेत.

डॉ.विजयकुमार गावित हे नंदुरबार मतदारसंघातून भाजपतर्फे,राजेंद्रकुमार गावित हे शहादा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे आणि नवापूर मतदारसंघातून शरद गावित हे अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहेत.विशेष म्हणजे हे तिघेही पहिल्यांदा नाही तर दुसऱ्यांदा एकाच वेळी निवडणूक रिंगणात आहेत. डॉ. विजयकुमार गावित हे यापूर्वी सहा वेळा जिंकले आहेत. यंदा ते सातव्यांदा रिंगणात आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला होता.डॉ.गावित यांनी आधी अपक्ष,नंतर तीन वेळा राष्ट्रवादी व दोन वेळा भाजपाकडून उमेदवारी केली आहे. यंदा पुन्हा ते भाजपाचे उमेदवार आहेत. विजयकुमार गावित यांचे लहान बंधू शरद गावित यांनी २००९ मध्ये नवापूर मतदारसंघातून विजय मिळविला होता.नंतर ते २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवार राहिले.परंतु त्यांना यश मिळाले नाही. यंदाही ते अपक्ष म्हणून निवडणुक लढवत आहेत.तर
राजेंद्रकुमार गावित हेदेखील दुसऱ्यांदा निवडणुक रिंगणात आहेत.२०१४ च्या निवडणुकीत त्यांनी शहादा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवली,परंतु त्यात त्यांना यश आले नाही. आता त्यांनी पुन्हा शहादा मतदारसंघातच काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळवली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top