नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी रशियाच्या दौऱ्यावर आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास रवाना झाले. त्यांचा हा दौरा २ दिवस असणार आहे. पंतप्रधान मोदी गेल्या ४ महिन्यांत दुसऱ्यांदा रशियाला भेट देत आहेत. यापूर्वी ते जुलैमध्ये भारत-रशिया शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आले होते. या दोन दिवसीय दौऱ्यामध्ये ते रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची भेट घेणार आहेत. उद्या ते ब्रिक्सच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. ही बैठक दोन सत्रांत होणार आहे. सकाळी बंद खोलीत चर्चा होईल. यानंतर सायंकाळी खुली चर्चा होईल. या दरम्यान पंतप्रधान मोदी अनेक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चाही करतील. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने कालच माहिती दिली की लडाखमध्ये गस्तीबाबत भारत आणि चीन यांच्यात करार झाला आहे. त्यामुळे ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |