सहा पिकांच्या हमीभावात वाढ केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

नवी दिल्ली – सहा रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर माध्यमांना ही माहिती दिली.शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची शाश्वती मिळावी आणि रब्बी हंगामात प्रमुख पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेण्यात आला आहे,असे वैष्णव यांनी सांगितले.मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार आता गव्हाच्या हमीभावात १५० रुपये, जवसच्या किमतीत १३० रुपये, मसूरच्या २७५, हरभरा २१० रुपये, मोहरी ३०० रुपये आणि करडईच्या किमतीत १४० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार गव्हाचा हमीभाव आता प्रतिक्विंटल २ हजार २७५ रुपयांवरून २ हजार ४२५ रुपये, करडईची १ हजार ८५० रुपयांवरून १ हजार ९८० रुपये, हरभरा ५ हजार ४४० रुपयांवरून ५ हजार ६५० रुपये, मसूर ६ हजार ४२५ रुपयांवरून ६ हजार ७०० रुपये, मोहरी ५ हजार ६५० रुपयांवरून ५ हजार ९५० रुपये करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top