टेक्सास – सन २००२ मध्ये रॉबर्ट रॉबरसन या व्यक्तीने आपल्या दोन वर्षांच्या मुलीची हत्या केली होती.मात्र हे प्रकरण खूपच वेगळे आहे.रॉबर्ट निक्की कर्टीस नावाच्या या चिमुरडीला दोन्ही हातात पकडून गदगदा हलवले होते. त्यामुळे तिच्या मेंदूत अंतर्गत रक्तस्त्राव होऊन तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणीचा खटल्यात रॉबर्ट आपण निरपराध असल्याचे सातत्याने सांगत होता. मात्र तज्ज्ञांच्या मते शेकन बेबी सिंड्रोममुळे निक्कीचा मृत्यू झाला असून त्याला पूर्णपणे रॉबर्ट जबाबदार आहे. शेकन बेबी सिंड्रोम हा प्रकार दोन वर्षांहून लहान वयातील मुलांसोबत घडतो. त्यांना कोणी उचलून अगदी जोरजोराने हलवल्याने त्यांच्या मेंदूतील नसा फाटतात आणि त्यांचा मृत्यू होतो.
रॉबर्टला याच शेकन बेबी सिंड्रोमबद्दल दोषी ठरविण्यात आले असून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या आठवड्यात रॉबर्टला विषारी इंजेक्शन देऊन मृत्यूदंडाच्या शिक्षेची कार्यवाही करण्यात येणार आहे.शेकन बेबी सिंड्रोमला जबाबदार ठरलेला आणि त्यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलेला रॉबर्ट हा अमेरिकेतील या पहिला गुन्हेगार ठरला आहे.