भंडारदरा धरणावर दुसर्‍यादिवशीही ड्रोनच्या घिरट्या

अकोले- तालुक्यातील आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे उर्फ भंडारदरा धरणावर रविवारी सलग दुसर्‍या दिवशीही काही ड्रोन घिरट्या घालताना आढळले.या ड्रोनमुळे धरणाच्या सुरक्षेचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सध्या भंडारदरा धरण १०० टक्के भरले आहे.गेल्या तीन दिवसापासून भंडारदरा धरणावर रात्रीच्या सुमारास दहा ते अकरा ड्रोन घिरट्या घालताना दिसत आहेत.हे ड्रोन पाबरगडाच्या दिशेने येत असून ते भंडारदरा धरण,कळसुबाई,हरिश्चंद्रगड अभयारण्यातील,रतनवाडी, घाटघर,अलंग-कुलंग-मलंग किल्ले,कळसुबाई पर्वतरांग, वाकी व परत पाबरगडाच्या दिशेने जाताना दिसून येत आहेत.तीन दिवसांपासून दिसत असलेल्या या ड्रोनमुळे वनविभाग व पोलीस विभाग सतर्क झाले आहे.धरणाची सुरक्षितता ही अतिशय महत्त्वाची असून भंडारदरा धरणावर उडत असलेले ड्रोन हे नक्की कुणाचे आहेत? आपत्ती व्यवस्थापनाकडे याची काही माहिती उपलब्ध आहे का? महसूल विभागाकडून ही माहिती वरिष्ठांना कळविली गेली का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top