गोरेगावच्या महात्रिपुरसुंदरी देवस्थानचा नवरात्री उत्सव

मुंबई – शारदीय नवरात्रोत्सव यंदा गोरेगावात महात्रिपुरसुंदरी देवस्थानच्यावतीने पारंपारीक पध्दतीने मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे.हा शारदीय नवरात्री उत्सव उद्या गुरुवार ३ ऑक्टोबर ते शुक्रवार ११
ऑक्टोबर दरम्यान श्री ललिताराजराजेश्वरी विश्वमोहिनी महत्रिपुरसुंदरी देवस्थान,गजानन महाराज मंदिर,बेस्ट नगर,गोरेगाव (पश्चिम) येथे होणार आहे.

या नवरात्री उत्सवामध्ये सोमवार ७ ऑक्टोबर रोजी श्री ललिता पात्रासादन व सहस्त्रार्चन- सप्तमी,बुधवार ९ ऑक्टोबर रोजी श्री बगलामुखी सहस्त्रार्चन, अष्ठमी,गुरुवार १० ऑक्टोबर रोजी अष्ठमी हवन व गोंधळ आणि शनिवार १२ ऑक्टोबर, शस्त्रपूजा व सरस्वती पूजा केली जाणार आहे.उर्वरित दिवशी सायंकाळी ५.३० वा. खड्गमाला सहित १००८ श्रीसुक्त आवर्तन व कुंकुमार्चन केले जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top