छत्रपती संभाजीनगर- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पर्यटन विभागात मोठा भूखंड घोटाळा उघड केला.” भर अब्दुल्ला गुड थैली में” अशी पोस्ट अंबादास दानवे यांनी एक्सवर केली. एमटीडीसीचे ३० रिसॉर्ट बिल्डर आणि भूमाफियांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप करत दानवे यांनी या रिसॉर्टची यादी जाहीर केलेली आहेत.
वेळणेश्वर(रत्नागिरी), चिखलदारातील मोकळी जागा(अमरावती), पानशेत (पुणे), सिल्लोरी (नागपूर), शेळपी-निवती किल्ला(सिंधुदूर्ग), गडपायली(नागपूर), फर्दापूर (छत्रपती संभाजीनगर). कार्ला (पुणे), कुणेकश्वर(सिंधुदुर्ग), छत्रपती संभाजीनगर, ओळवण (कोल्हापूर), फर्दापूरातील मोकळी जागा( छत्रपती संभाजीनगर, कोयनानगर(सातारा), भंडारदरा( अहमदनगर), लोणार (बुलढाणा), टीएससी (नागपूर), माळशेजघाट (ठाणे), नवेगाव बांध ( गोंदिया), चांदपूर (चंद्रपूर), मिठबांवातील मोकळी जागा(सिंधुदुर्ग), वर्धा, सिंहगड(पुणे), शेगाव (बुलडाणा) माहूर(नांदेड), गणपतीपुळे (रत्नागिरी), ग्रेपार्क (नाशिक), भिमाशंकर (पुणे), बोधलकसा(गोंदिया), तारकर्ली (सिंधुदुर्ग) या ३० ठिकाणांवरील एमटीडीसीचे ३० रिसॉर्ट बिल्डर आणि भूमाफियांना देण्याचा घाट असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.