विनेशने देशाची माफी मागावी बबिता, योगेश्वर यांची मागणी

नवी दिल्ली- पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट अंतिम फेरीत पोहोचली आणि पदक निश्चित झाले.मात्र,अंतिम फेरीपूर्वी १०० ग्रॅम जास्त वजनामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले.तरीही विनेश भारतात परतल्यावर विमानतळावर तिचे जंगी स्वागत झाले.खरे तर तिच्या चुकीमुळे आपला देश एका पदकाला मुकला आहे. त्यामुळे तिने देशाची माफी मागावी अशी मागणी विनेशची चुलत बहीण बबिता फोगट आणि ऑलिम्पिक पदक विजेता योगेश्वर दत्त या दोघा माजी कुस्तीपटूंनी केली आहे.

यासंदर्भात योगेश्वर दत्त म्हणाला की,विनेश फोगटचे पॅरिसहून परतल्यानंतर विमानतळावर केलेले स्वागत चुकीचे होते.जेव्हा एखादा खेळाडू अपात्र ठरतो तेव्हा त्याने देशाची माफी मागितली पाहिजे की त्याने चूक केली आणि माझ्यामुळे देशाला पदक गमवावे लागले.प्रत्येकाला माहित आहे की खेळाडूचे वजन एक ग्रॅम कमी असो किंवा ५० ग्रॅम किंवा १०० ग्रॅम जास्त असला तरी तो अपात्र ठरतो. याबाबत चुकीचे वातावरण निर्माण केले. विनेशला अपात्र ठरवल्यानंतर नियमांचे किंवा संघटनेचे किंवा आयोजकांचे चुकले, असे वातावरण देशभर निर्माण केले.तिच्या जागी मी असतो,तर मी माफी मागितली असती की, मी माझे वजन नियंत्रणात आणू शकलो नाही, माझ्यामुळे देशाला पदक गमवावे लागले.इथे तर तिचे स्वागत होत आहे.देश पंतप्रधानांना शिव्या देत आहे.चुकांचे स्वागत करण्याची प्रथा सुरू झाली आहे जी चुकीची आहे.

तसेच बबिता म्हणाली की,
मी स्वत: २०१२ मध्ये अपात्र ठरली होते. मला भारतातही अपात्रतेची शिक्षा झाली.
त्यावर्षी मी ऑलिम्पिक चाचण्याही खेळू शकले नाही. कारण ती माझी चूक आहे,हे मला माहीत होते. मला २०० ग्रॅमच्या फरकामुळे अपात्र ठरवण्यात आले होते.ही जबाबदारी खेळाडूची असते,कारण खेळाडूला वजन मोजण्याच्या मशीनवर उभे राहावे लागते. तिथे प्रशिक्षक किंवा कोणताही सपोर्टिंग स्टाफ उभा राहत नाही.कोचिंग स्टाफ प्रयत्न करतो पण शेवटी आमचीच चूक असते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top