वॉशिंग्टन – अमेरिकेत सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी राष्ट्राध्यक्ष आणि राष्ट्राध्यक्षपदाचे रिपब्लिकन पार्टीचे विद्यमान उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच्या राजकीय भवितव्याबद्दल भाष्य केले.आताची निवडणूक जर हरलो तर पुन्हा निवडणूक लढविणार नाही,असे एका मुलाखतीदरम्यान ट्रम्प यांनी सांगितले.आताची निवडणूक हरल्यास पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविणार का असा प्रश्न विचारला असता ट्रम्प म्हणाले की, ही निवडणूक मी जिंकेन याची मला खात्री आहे.माझा पराभव होईल असे वाटत नाही.पण दुर्दैवाने पराभव झालाच तर पुढील निवडणूक मी लढवणार नाही.राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेतून विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी कधीच माघार घेतली आहे. ट्रम्प यांचा सामना डेमॉक्रॅटिक पार्टीच्या उमेदवार विद्यमान उप राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्याशी आहे. निवडपूर्व कलांमध्ये हॅरिस सध्या ट्रम्प यांना मागे टाकत आहेत.
हरलो तर पुन्हा लढणार नाही डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य
![](https://navakal.in/wp-content/uploads/2023/05/trump-rd-er-171212_16x9_1600-1024x576.jpg)