५० खोके एकदम ओके! वाघांचे झाले बोके -खा. अमोल कोल्हेंची नवी घोषणा

पुणे – एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांनी बंड करून महायुती सरकार स्थापन केल्यानेतर ’50 खोके, एकदम ओके’ अशी घोषणा देत महाविकास आघाडीकडून त्यांना हिणवले जात आहे. आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी नवी घोषणा दिली. ५० खोके एकदम ओके आणि वाघांचे झाले बोके, असे अमोल कोल्हे म्हणाले. त्यांची ही नवी घोषणा चर्चेत आली आहे. राष्ट्रवादी ‘शिवस्वराज्य यात्रा’ आज जळगावमधील चोपडा येथे आली होती. यावेळी जाहीर सभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी दमदार भाषण केले. ते म्हणाले. की, ठेकेदार कहता है मे भिकारी हुँ. अफसर कहता है मै पुजारी हूँ. आजकाल सत्ता पक्ष के नेता कहने लगे मै तो व्यापारी हुँ…, जनता कहती मैं बिचारी हुँ… जळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या पाच आमदारांना निवडून दिल्यानंतर जनतेला वाटले होते की आम्ही काहीतरी शिवसेनेचे वाघ निवडून दिले. ५० खोके एकदम ओके आणि वाघांचे झाले बोके. राष्ट्रवादीचा एक आमदार सुद्धा जळगाव जिल्हा शरद पवार यांच्या ताकतीवर निवडून आला मात्र मंत्री पदाच्या खुर्चीसाठी त्यांनी गद्दारी केली. जळगाव जिल्ह्यातल्या सहा आमदारांनी गद्दारीचा वार हा जनतेच्या काळजावर केला आहे. याचे उत्तर जळगाव जिल्ह्यातल्या जनतेला द्यावा लागेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top