नागपूर- आमचे चौथ्यांदा सरकार येण्याची गॅरंटी नाही, पण आठवले पुन्हा मंत्री होण्याची गॅंरटी आहे अशी कोपरखळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मारली. आज मारवाडी फाऊंडेशनर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराचे आयोजन नागपूरमध्ये केले होते. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या भाषणात रामदास आठवले यांनी आतापर्यंत तीनवेळा केंद्रात मंत्रिपद मिळाले आणि चौथ्यांदा सरकार आल्यावर मंत्री होणारच असे मत व्यक्त केले. रामदास आठवले यांनी मंत्रिपदाबाबत भाष्य केल्यानंतर नितीन गडकरी म्हणाले की, चौथ्यांदा आमचे सरकार येण्याची गॅरंटी नाही. मात्र रामदास आठवले यांना सरकार येऊन ते पुन्हा मंत्री होणार ही गॅंरटी आहे. सरकार कोणाचेही आले तरी रामदास आठवले यांचे मंत्रिपद पक्के आहे. रामदास आठवले राजकारणातील हवामान शास्त्रज्ञ आहेत. त्यांना हवा कुठल्या दिशेने चालत आहे याचा अंदाज येतो.