गडचिरोली- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरवात करत प्रत्येक महिलेला दार महिन्याला १५०० रुपये घोषणा केली होती. त्यानुसार या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी करण्याची मुदत होती. ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी करणाऱ्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे एकत्रित जमा झाले आहेत. योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्याने उर्वरित महिलांनीदेखील नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र १ सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्यांचे लाभ मिळणार नाहीत, तर ज्या महिन्यात ते नोंदणी करणार त्याच महिन्याचे लाभ मिळणार आहे. आतापर्यंत ७० ते ७५ टक्के महिलांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी गडचिरोली येथे दिली. विशेष म्हणजे, सप्टेंबरमध्ये नोंदणी केल्यास तीन महिन्यांचे पैसे मिळतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच काही दिवसांपूर्वी आपल्या भाषणात सांगितले होते.
सप्टेंबरमध्ये लाडकी बहीणची नोंदणी केल्यास दोन महिन्यांचा लाभ नाही
![](https://navakal.in/wp-content/uploads/2024/07/ladki-bahin-1024x599.jpg)