मुंबई- मानखुर्द आणि वाशी रेल्वे स्थानकांदरम्यान आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे मुंबईतील हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. २० ते २५ मिनिटांपासून हार्बर मार्गावरील अनेक लोकल या विविध स्थानकात थांबल्या होत्या. तर काही लोकल या ट्रॅकवरही थांबल्या होत्या. त्यामुळे वाशी, कुर्ला या रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. तर अनेक प्रवाशांनी जीव मुठीत घेऊन रेल्वे ट्रॅकवरुन चालत प्रवास केला. मात्र अचानक हा बिघाड झाल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला होता व अनेक प्रवाशांना ऑफिसला पोहोचायला, विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये जाण्यास उशीर झाला होता. त्यामुळे नागरिक संतप्त झाले होते. दरम्यान, या कालावधीत प्रवाशांना काढलेल्या सामान्य तिकीट आणि पासचा वापर करत ट्रान्सहार्बर मार्गे प्रवास करण्याची परवानगी रेल्वे प्रशासनाने दिली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम केले व तब्बल दोन तासानंतर हार्बर रेल्वे सुरळीत सुरु झाली.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |