ठाणे- गेल्या तीन-चार दिवसांपासुन ठाणे शहरासह जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मोडक सागर व बारवी ही दोन धरणे १०० टक्के भरली आहेत. तर भातसा आणि तानसा ही दोन धरणे ९५ टक्के भरली आहेत. त्यामुळे ठाणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे,अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
ठाणे जिल्ह्याला जास्तीत जास्त पाणीपुरवठा हा बारवी धरणातून होत असतो. हा पाणीपुरवठा ठाण्यासह कल्याण- डोंबिवली,मीरा – भाईंदरसह अंबरनाथ पालिकेसह जिल्ह्यातील गावांनाही केला जातो. विशेष म्हणजे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रालाही याच धरणातून पाणीपुरवठा होत असतो.या सर्व धरण क्षेत्रातच गेल्या चार दिवसांत दमदार पाऊस पडला आहे.