नवी दिल्ली – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांचा एक फोटो इन्स्टावर शेअर केला आहे. सोनिया गांधी आपल्या लाडक्या श्वानासोबत दिसत असून त्यावर ‘माझ्या आईची लाडकी नुरी ‘असे लिहिले आहे.
सोनिया गांधी यांनी लाडक्या नुरीला आपल्या पाठीवर घेतले आहे असा तो फोटो आहे .राहुल गांधी यांनी हे श्वान उत्तर गोव्यातील मापुसा येथून आपल्या आईसाठी आणले होते. तेव्हापासून ती कुटुंबातील सदस्य बनली आहे. सोशल मीडियावर या फोटोला खूप पसंती मिळत आहे .गांधी कुटुंबातील श्वान चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी त्यांचा ‘पॅडी’ नावाचा श्वान चर्चेत
होता.